लातूर: लातूर महानगरपालिकेनं दोन अडीच महिन्यांपूर्वी रस्ता दुभाजकात पामची झाडे लावली. ही झाडे महाग आहेत, दिसायलाही सुंदर आहेत. पण त्यांच्या वृद्धीसाठी आपल्याकडे पोषक वातावरण नाही. परिणामी ही झाडे वाळून गेली. दुभाजकात अशी झाडे अतिशय वाईट दिसू लागली. याची बातमी आजलातूरने प्रसारित केली. ही झाडे लावतानाही आजलातूरनेच बातमी प्रसारित केली होती. ही झाडे आपल्याकडे टिकणार नाहीत, यासाठी लागणार वातावरण नाही असा सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला प्ण कुणाचीच ऐकायची तयारी नव्हती. परिणामी ही झाडे वाळून गेली. न लावलेली झाडे उमेदीनं आली. काही ठिकाणी कन्हेरीची लवण करण्यात आली होती. ही कन्हेरी आज उत्तम आहे.
Comments