HOME   टॉप स्टोरी

यांच्यावर कोण कारवाई करणार?

सरकारी इमारतींच्या भिंती आणि कमानी यांच्यावर जाहिराती लावण्यास बंदी, कुठे गेली?


लातूर: काही वर्षांपूर्वी आम्ही एक दैनिक काढलं होतं. त्याचे पोस्टर्स शहरभर लावण्यात आले होते. आमच्यातल्या काही लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर ही पोस्टर्स लावली. नियमाप्रमाणे आम्हाला नोटिसा आल्या. कारवाईचे इशारेही आली. आम्ही ती पोस्टर्स काढून घेतली आणि लेखी माफी मागितली. आता जिल्हाधिकारी, प्रशासकीय इमारत आणि जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर माजी खासदार जयवंतराव आवळे आणि मांजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसाचे मोठ मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे. हे धनंजय देशमुख आणि जयवंतराव आवळे लातुरकरांच्या किती उपयोगी पडले हे माहीत नही पण, लोकनेते विलासराव देशमुख, सहकाररत्न दिलीपराव देशमुख आणि राज्याचे उभरते युवा नेते आ. अमित देशमुख यांच्या कामी नक्की आले असतील यात शंका नाही!


Comments

Top