HOME   टॉप स्टोरी

कर्णबधिरांचा मोर्चा, बलात्कार्‍यांना तातडीने फाशी देण्याची मागणी

चेन्नईतली घटना, १८ आरोपींना अटक आणखी पाच जणांचा शोध जारी


लातूर: चेन्नईत एका ११ वर्षीय कर्णबधीर मुलीवर २३ जणांनी बलात्कार केला. प्रत्येकवेळी तिला गुंगीचे औषध दिले जायचे. बलात्कार करताना चित्रिकरणही केले जायचे. जिवे मारण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली जायची. या प्रकरणात १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी पाचजण फरार आहेत. या सर्वांना तातडीने फाशी द्यावी अशी कर्णबधिरांच्या मोर्चाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यावेळी राजकुमार सुडे, जयप्रकाश अग्रवाल, दिनेश राठी, संजय आष्टके, बालाजी चव्हाण, संजय मंडाळे, प्रमेश्वर सुतार, गोपाळ शेंडगे, संग्राम जिवने, विवेकानंद सोनकवडे, भास्कर शिंदे, उत्तम नाडागुडे उपस्थित होते.


Comments

Top