HOME   टॉप स्टोरी

मागे हटायचे नाही, मध्यस्थाची गरज नाही

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्धार, विधीमंडळाचे अधिवेशन बोलवा


लातूर: मराठा आरक्षणासाठी ०९ ऑगस्टपासून व्यापक जन आंदोलन केले जाणार आहे. महिला, मुलं, पाळीव जनावरांसोबत प्रत्येक गावात आंदोलन उभारले जाईल. काही दिवसात मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असे मराठा क्रांती मोर्चाच्या लातुरात पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
राहीचंद्र मंगल कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला २२ जिल्ह्यातील समन्वय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एकूण नऊ ठराव घेण्यात आले. मराठा आंदोलनाला सरकारनेच आंदोलनाला हिंसक वळण दिले असा मुख्य आरोप या बैठकीत करण्यात आला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शासनाला यापूर्वीच मागण्यांचे निवेदन दिले आहे. आता कसलीही चर्चा करायची नाही आणि कुणाचीही मध्यस्थी नको आहे, ०१ ऑगस्टपासून त्या त्या जिल्ह्यामध्ये मंत्री, आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, मराठा आंदोलनातील शहिदांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये द्यावेत, या कुटुंबातील सदस्यास सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, काकासाहेब शिंदे आणि तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकार्‍यांची एसआयटी चौकशी करावी, केवळ मराठा आरक्षणासाठी विधीडळाचे अधिवेशन बोलवावे, आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकार सोबत असहकार आंदोलन केले जईल, राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची या नंतरची बैठक परभणी येथे आयोजित केली जाईल असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.


Comments

Top