लातूर: मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. आता तो हिंसकही होत आहे. या आंदोलनात टप्प्याटप्प्याने मोहिमा राबवल्या जात आहेत. आधी निवेदने दिली. नंतर वर्षभर शिस्तीतले मूक मोर्चे काढण्यात आले. आता ठोक मोर्चाची भूमिका घेण्यात आली आहे. एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट मंत्री, आमदार आणि खासदारांच्या घरासमोर निदर्शने, ठिय्या आंदोलन करण्याचा उपक्रम सुरु आहे. परवा आ. अमित देशमुख यांच्या बाभळगावच्या घरासमोर ठिय्या आणि निदर्शने करण्यात आली. दरम्यान आ. अमित देशमुख गोव्याच्या दौर्यावर आहेत. ठिय्या आंदोलनावेळी आपण सर्वांशी बोललो असतो, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता असं आ. अमित देशमुख आजलातूरशी बोलताना म्हणाले.
Comments