HOME   टॉप स्टोरी

असा झाला स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

पहिल्यांदाच पोलिस मैदानावर, तरीही उपस्थिती लक्षणीय


लातूर: नेहमीच्या प्रथेप्रमाणे लातुरचा मुख्य ध्वजारोहण थाटात पार पडला. पालकमंत्री संभाजी पाटील यांनी ध्वजारोहण केलं. हा कार्यक्रम पोलिस मैअदानावर पार पडला. तरीही उपस्थिती लक्षणीय होती.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत एक हजार पेक्षा अधिक आजारांचा समावेश असल्याने सर्वसामान्य व दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. जिल्हयातील १३ रुग्णांलयांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ ३७ हजार रुग्णांना देण्यात आलेला आहे. संबंधीत प्रत्येक रुग्णालयात एका आरोग्यमित्राची नेमणूक करण्यात आल्याने सर्वसामान्यांना योजनेचा लाभ सुलभ रितीने मिळत आहे,असे प्रतिपादन कामगार कल्याण,कौशल्य,भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
मुख्य शासकीय ध्वजारोहणा प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, माजी खासदार रुपाताई पाटील, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, अतिरीक्त पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा परिषद उपाध्य्क्ष रामचंद्र तिरूके, उपजिल्हाधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जनार्धन विधाते, तहसिलदार संजय वारकड आदिसह स्वातंत्र्य सेनानी,ज्येष्ठ नागरिक, पालक,विद्यार्थी, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २८ जून २०१७ रोजी जाहीर करुन राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटीची कर्जमाफी देण्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेऊन राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या अंतर्गत लातूर जिल्हयातील ०१ लाख ४० हजार ५५० शेतकऱ्यांना ३८१ कोटी ६२ लाखाची कर्जमाफी देण्यात आली असून उर्वरित सुमारे १३ हजार शेतकऱ्यांना दीड लाखापेक्षा अधिकची रक्कम एक रक्कमी परतफेड योजनेंतर्गत भरण्यासाठी शासनाने ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी या मुदतवाढीचा लाभ जिल्हयातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


Comments

Top