HOME   टॉप स्टोरी

सतशील राजकारणी गेला, खरा लोकनेता गमावला

अंत्यदर्शन सुरु, उद्याही अंत्यदर्शन, चार वाजता अंत्यसंस्कार


सतशील राजकारणी गेला, खरा लोकनेता गमावला

नवी दिल्ली: भारतीय राजकारणातील सत्पुरुष, अजातशत्रू, आदर्श राजकारणी, कवी अटल बिहारी वाजपाई यांनी आज ९४ व्या वर्षी संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या ६६ दिवसांपासून ते उपचार घेत होते. दोन दिवसांपासून उपचाराला ते दाद देत नव्हते, त्यांना जीवन रक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या घरी अंत्यदर्शन सुरु आहे, उद्याही एक वजेपर्यंत अंत्यदर्शन चालेल. दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार केले जातील. अटलजींच्या जाण्याने सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया....
* अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर
* वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार
* अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
* अमित शाह, नितीन गडकरी यांनीही व्यक्त केला शोक
* अटलजी आमचेही राजकीय पालकच होते, कटुता न ठेवता राजकारण केले- संजय राऊत
* साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार
* भारतीय राजकारणातले भीष्म पितामह हरवले
* अनेक मोठे नेते रुग्णालयात, मृतदेह एम्स मधून नेण्याची घाई सुरु
* वाजपेयींच्या जाण्याने मी शून्यात गेलो- पंतप्रधान मोदी
* सोनिया गांधी, राहूल गांधी यांनीही घेतलं अंत्यदर्शन
* अटलजी सर्वांना सोबत घेऊन चालायचे- ममता बॅनर्जी


Comments

Top