HOME   टॉप स्टोरी

मांजरा धरणात केवळ आठ टक्के जिवंत पाणी साठा

मृत साठा ४७ टक्के, एकूण ५५ टक्के पाणी पुढे वर्षभर पुरेल


मांजरा धरणात केवळ आठ टक्के जिवंत पाणी साठा

लातूर: लातूरसह सात गावांना पाणी पुरवणार्‍या मांजरा-धनेगाव धरणात जिवंत पाणीसाठा केवळ आठ टक्के शिल्लक आहे. मत साठ्यासह हे पाणी ५५ दश लक्ष घनमीटर इतके होते. हे पाणी पुढचे वर्षभर पुरु शकते. पावसाळा सुरु आहे पण अद्याप धरणात पाण्याची आवक नाही. या धरणावर लातूर, अंबाजोगाई, कळंब, केज, धारुर, मुरुड आणि लातूर एमआयडीसी आदी गावे अवलंबून आहेत. दरम्यान वरवंटीचे जलशुद्धीकरण केंद्रही चालू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या राजधानी टाकीवरुन सकाळी पाणी सुटायला हवे पण मध्यंतरी दोन दिवस वीजपुरवठा खंडीत झाल्याने हे पाणी येण्याची शक्यता केवळ ५० टक्के आहे अशी माहिती जलशुद्धीकरण केंद्राचे प्रमुख विजय चोळखणे यांनी सांगितले.


Comments

Top