लातूर: महिलांनी रुद्रावतार दाखवला की काहीही होऊ शकतं. प्रभाग १२ मधे परवाना रद्द झालेलं देशी दारुचं दुकान महिलांनी फोडलं. दारुच्या बाटल्या आणि सामानाची तोडफोड केली. बाटल्या बाहेर आणून जाळून टाकल्या. प्रशासनाला बांगड्यांचा आहेर दिला. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. पंचवटीनगर परिसरात नागरिकांचा विरोध असूनही दारुचं दुकान थाटण्यात आलं. या परिसरात आधीच एक दारु दुकान आहे. या दोन्ही दुकानांचा आणि दारुड्यांच्या त्रास होऊ लागल्याने महिला खवळल्या. नगरसेविका दिपा गिते आणि शशिकला गोमचाळे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी हे आंदोलन केलं. एमआयडीसी पोलिस ठाण्यातही हलगी वाजवत ठिय्या दिला. दुकानात आंदोलन सुरु असताना दुकान मालक आला. त्याने दोघा तिघांना मारहाण केली, सोडवण्याचा प्रयत्न करणार्या महिलेलाहे चोप दिला. या दारु दुकानाला बांधकाम परवाना नसल्याने ते पाडण्याचे आदेश अतिक्रमण विरोधी पथकाला देण्यात होते हे विशेष!
Comments