लातूर: लातूर शहरातील अनेक भागात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणार घाण केली जायची, नको नको त्या गोष्टी केल्या व्हायच्या. नागरिक ते निमूटपणे सहन करायचे. यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रामबाण उपाय केला. अशा ठिकाणी विरंगुळा आणि वाचन कट्टे तयार केले. सिमेंटचे बाकडे बसवले, पिण्याच्या पाण्याची सोय केली, वर्तमानपत्रेही उपलब्ध करु दिली. ते सगळं चांगलं चालू आहे. पण साळेगल्ल्ली भागातील जनता यापेक्षाही हुशार निघाली. महावितरण कार्यालयाच्या मागे असलेल्या यशवंत शाळेच्या पाठ भिंतीला प्रचंड कचरा जमायचा. या शाळेतल्या शिक्षकांनी घाण साफ केली आणि वाचन कट्टा बनवला. साळे गल्लीतल्या रहिवाशांनी वाचन कट्ट्याच्या आजुबाजुला नेहमीसारखी कचर्याची घाण सुरु केली आहे. त्यावर अनेकजण नाराज आहेत. ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली, तेही खजिल झाले आहेत. कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी एका संस्थेला देण्यात आली आहे. ही संस्था चांगले काम करीत आहे पण हा तमाशा का व्हावा हा खरा प्रश्न आहे.
Comments