लातूर: लातूर शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी लोक नैसर्गिक विधी उरकतात. ही बाब अनेक वर्षांपासून सगळेजण पाहतात, कधी ओरडतात, कधी निषेध करतात. पण लातुरला आयुक्त म्हणून आलेले कौस्तुभ दिवेगावकर यांनी धाडसी निर्णय घेत शहरातल्या १७ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला. नुसताच निर्णय घेतला नाही तर कामही सुरु केले. आज शहरातल्या १७ ठिकाणी कामे प्रगती पथावर आहेत. यात जुना एणापूर नाका, नांदगाव वेस, गांधी चौक, पीव्हीआर चौक, बार्शी रोड पाण्याची टाकी, दयानं द गेटस्मोर, आर्वी बुस्टर पंपाजवळ, नंदी स्टॉप, मित्रनगर उड्डाण पुलाखाली, बसवेश्वर चौक, अशोक हॉटेल चौक, शिवाजी चौक, गंजगोलाई पूर्व बाजू, गंजगोलाई पश्चिम बाजू, अण्णाभाऊ साठे चौक, विवेकानंद चौकाणि गुळ मार्केट चौक आदी भागांचा समावेश आहे.
आजवरच्या एकाही मुख्याधिकार्याला, नगराध्यक्षाला, महापौराला आणि आयुक्ताला ही बाब सुचली नाही पण लातुरचे सुपुत्र नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर या बहाद्दरानं हे काम करुन दाखवलं. पुढे या उपक्रमाची काय वाट लागेल ते सांगता येत नाही पण कौतुकास्पद उपक्रम कौस्तुभ सरांनी सुरु केला याबद्दल सामान्य लातुरकरात मात्र आनंद आहे.
Comments