दलित, वंचित, ओबीसी आणि मुस्लीम यांना एकत्र आणून राजकीय परिवर्तन घडवण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी घेतला आहे.
अस प्रयोग पूर्वी झाला होता पण तो टिकला नाही. पण त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आताची स्थिती वेगळी आहे.
समाजातल्या अनेक पिडीत, वंचित, अल्पसंख्याकांना, ओबीसींना राजकीय संधी मिळू दिली गेली नाही.
हाच मुद्दा पुढे करुन ओवेसी-आंबेडकरांनी हा निर्णय घेतला आहे.
या नव्या युतीची जाहीर-मोठी सभा दोन तारखेला औरंगाबादला होत आहे.
इतकी वर्षे कॉंग्रेसला धरुन राहिलेला हा वर्ग यावेळी आपला विचार बदलेल का?
या सगळ्या मुद्यांचा परामर्श घेतलाय सामाजिक-राजकीय नव्या पिढीचे नेते अफजल कुरेशी यांनी.
Comments