लातूर: लातूर शहरातील १९६२ साली स्थापन झालेल्या आझाद चौकामधील आजोबा गणेश मंडळ. लातूर शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणूण ओळखला जातो. भारत आणि रत्नदीप आझाद गणेश मंडळ ही वेगवेगळी मंडळे होती. त्यांचे विलीनीकरण करून भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. हे मंडळ विविध सामाजिक कार्यक्रम घेत आले आहे. या गणपतीच्या १० दिवसात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या मंडळास शहरात पहिला विसर्जनाचा मान आहे. हे मंडळ दर वर्षी शेवटच्या मिरवणुकीतील देखाव्यामुळे प्रसिद्ध आहे. या वर्षी वरुणराजा आणि शेतकरी यांचे भव्य देखावे बनविण्यात आले आहेत. पुढील ०६ महिन्यात नियोजित जागेत मुर्तीची प्राणप्रतिष्टापना करण्यात येणार आहे असे सिद्रामप्पा पोपडे यांनी सांगितले.
Comments