HOME   टॉप स्टोरी

औषध विक्रेत्यांचा बंद, तातडीची सेवा तयार

9422071654 Ramdas Bhosle, 9422071744 Ishwar Baheti, 7588612467 Nagesh Swami


लातूर: आज देशभरातले औषध विक्रेते संपावर गेले आहेत. काल रात्री १२ वाजल्यापासून आज रात्री २ वाजेपर्यंत हा संप चालणार आहे. आजकाल बर्‍याच गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. त्यात औषधांचीही भर पडली आहे. या औषधांची खात्री कोण देणार? काही उलट परिणाम झाल्यास कोण जिम्मेदार असणार? कुणाकडे दाद मागायची? असे अनेक प्रश्न तर आहेतच. शिवाय खोटी प्रिस्क्रिप्शन्स पाठवून नशा आणणारी औषधी सुद्धा मागवली जाऊ शकतात त्याने समाजाचे नुकसान होणार नाही का? शिवाय पारंपारिक पद्धतीने, प्रामाणिकपणे औषध विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांच्या व्य्वसायावर परिणाम होणार नाही का? असे अनंत प्रश्न निर्माण झाले आहेत. औषध विक्रेते संपावर गेले असले तरी त्यांनी लातुरकरांना तातडीची-अत्यावश्यक-इमर्जन्सी सेवा देण्याचंही ठरवलं आहे. त्यासाठी औषध विक्रेता संघाने तीन फोन नंबर्स दिले आहेत. ते असे 9422071654 Ramdas Bhosle, 9422071744 Ishwar Baheti, 7588612467 Nagesh Swami


Comments

Top