लातूर-किल्लारी: आज किल्लारीच्या भुकंपास २५ वर्ष पूर्ण झाले. यामुळे भारतीय जैन संघट्नेच्या मार्फत निर्धार संमारंभाचे आयोजन किल्लारी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमात २५ वर्षाखाली झालेला निसर्गाचा विकोप विसरून आज नवीन जल क्रांती करण्याचा निर्धार राज्याचे मुख्यमंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटीलांनी केला आहे. लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. येथील भूकंपाच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन मुख्यमंत्री पवार यांचा भूकंपग्रस्तांच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित केला. त्यावेळी केलेले आपत्ती व्यवस्थापन हे कौतुकास्पद आहे आणि आता येणारी संकटे हे निसर्गनिर्मीत नसून ते मानव निर्मीत आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्यात चालवलेले ईंद्रप्रस्थ जल अभियान हे चांगले आहे यातून जिल्हा दुष्काळमुक्त करता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी किल्लारी येथील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आगामी काळात राज्याची वाटचाल ही दुष्काळमुक्ती कडे नेण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यानी केला. किल्लारी येथील काही लोकांना अजुनपर्यंत पक्की घरे मिळाली नाहीत त्यांना लवकरात लवकर घरे देण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला .यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील, आमदार राणा जगजितिसंह पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, शैलेश पाटील चाकूरकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश बिराजदार उपस्थित होते.
Comments