HOME   टॉप स्टोरी

गोलाईतल्या छोट्या व्यापार्‍यांसाठी मोठा संघर्ष

मोहसीन खान सोमवारी करणार गोलाईत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन


लातूर: लातुरचं हृद्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या गंजगोलाईचा प्रश्न सतत चिघळतच राहतो. आपली मनपा अजून गोलाईच्या प्रश्नावर तोडगा काढू शकली नाही. परिणामी छोट्या व्यावसायिकांना पोलिस आणि महापालिकेचा दंडुका रोज झेलावा लागत आहे. अशाच एका प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान चौकशीला गेले तेव्हा पोलिसांनी ‘तुम सब हरामखोर हो’ अशी पदवीच देऊन टाकली. त्या विरोधात मोहसीन खान यांनी संघर्ष पदयात्रा काढली आणि गांधी चौक पोलिस ठाण्याच्या उप अधिक्षकाला निवेदन दिले. सोमवारी ही सगळी मंडळी गोलाईत ठिय्या आंदोलन करणार आहे.


Comments

Top