HOME   टॉप स्टोरी

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तावर नागरिकांचाच उपाय

लक्ष वेधण्यासाठी जनतेने्च केले प्रयोग सुरु, कुत्र्यांच्या पाटीवर झुली!


लातूर: लातूर शहरात अनेक भागात व गल्ली बोळात तसेच मेन रोड अश्या अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा कळप ३० ते ५० संख्येने दिसून येतो अश्या मार्गाने चालणे व जाणे यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. लहान बालकांना खेण्यांसाठी जिकरिचे झाले आहे. यात बऱ्याच बालकांना या कुत्र्यांच्या चाव्यापासून जखमी व्हावे लागले. त्यात कांही जणांना प्राण ही गमवावा लागला. सकाळी व रात्री फिरायला जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना या दबा धरुन बसलेल्या कुत्र्यांच्या कळपाची भीति वाटू लागली आहे. या कुत्र्याच्या कळप कधी अंगावर येईल याचा एनम नाही. या कुत्र्यांच्या त्रासापासून नागरिक हैराण झाले आहेत. वाहन चालकांचा पाठलाग केल्याने त्यापासून वाचण्यासाठी तो प्रयत्न करत असतांना अपघात होऊन अनेकजण जखमी होतात. या दुर्लक्षित करणाऱ्या मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अँड. अजय कलशेट्टी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी व बच्चे कंपनिनी कुत्र्याच्या आंगावर बोलके झूल घालून आता तरी करा बंदोबस्त करा. त्यांना हद्दपार करुन दाखवा असे मनपा प्रशासनास आव्हान केले होते. या अवाहनाचा मनपा कसा सामना करेल याकडे नागरिक पाहात आहेत. यावेळी अँड. अजय कलशेट्टी, जितेंद्र ढगे, संतोष मेंगशेट्टी, भागवत महिन्द्रकर, आकाश घोलप,गणेश गवळी,आकाश ढगे, सुमित भोकरे आदी अनेक ऊपस्थित होते.


Comments

Top