लातूर: मराठवाड्यावरील या वर्षाचे भयंकर दुष्काळाचे सावट. त्यात हवालदिल झालेला शेतकरी व त्याच्या समोरील समस्या आणि सरकारचा शेतकऱ्यांप्रति असंवेदनशीलपता या संदर्भात लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जनसंवाद यात्रेची घोषणा केली. ही यात्रा २६ ऑक्टोबर रोजी सारसा येथून सुरू होईल व पुढे ०३ नोव्हेंबर रोजी संपेल. या यात्रेतील प्रमुख मागण्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, लातूर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा. विद्युत बील माफ करावे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे या प्रमुख मागण्या घेऊन ही यात्रा निघणार आहे. सोबतच मराठवाड्याला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे शाश्वत पाण्याच्या नियोजनासाठी कृष्णा, गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी घेऊन यावे यासाठी ही जनसंवाद यात्रा निघणार आहे.
ही यात्रा कुठल्या पक्षाच्या बॅनरखाली निघणार हे माहित नाही. त्यांना कुठल्या पक्षाचं पाठबळ मिळत आहे अयाचाही खुलासा होऊ शकला नाही.
Comments