लातूर: कल्पना गिरी संशयस्पद मत्यू प्रकरणात एका आरोपीला मिळालेला जामीन रद्द करावा अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहोत अशी माहिती शिवसेना आ. निलम गोर्हे यांनी आजलातूरशी बोलताना दिली दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने लातुरात आयोजित महिला कायदेविषयक कार्यशाळेनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
गिरी कुटुंबियाच्या विनंतीवरुन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यालाही दोन वर्षे झाली. या प्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन खटला चालवावा यावे यासाठीही आपण गृहमंत्र्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे निलमताई म्हणाल्या.
Comments