लातूर: राज्यातील शिक्षण संस्था चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी आज लातूरसह उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात शैक्षणिक बंद ठेवण्यात आला. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन कमी पडले तर व्दितीय सत्रात शाळा चालू देणार नाही असा पवित्रा शिक्षण संस्था चालकांनी घेतला आहे. विनाअनुदानित शिक्षण संस्थाना अनुदान चालू करावे ही त्यातील प्रमुख मागणी आहे. या बंदला लातूर शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या बंदला शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, जुक्टा संघटना पाठींबा दिला आहे. राज्यसरकारचे लक्ष वेधण्यांसाठी हा लाक्षणिक बंद ठेवण्यात आला. औरंगाबादमध्ये शिक्षकांवर झालेला लाठीचार्ज असेल किंवा पोर्ट्लव्दारे वाढवलेली कामे असोत याचा निषेध नोंदवण्यासाठी हा बंद करण्यात आला असे मराठवाडा शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष असे रामदास पवार यांनी सांगितले.
Comments