लातूर: शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातला लातूर पॅटर्न सर्व परिचित आहे. यासोबतच आता प्रशासकीय क्षेत्रात राज्याला दिशादर्शक ठरणारे काम लातूरात होवू लागले आहे. राज्य सरकारने बुधवारी दुष्काळ जाहीर केल्यानंतर गुरूवारी पुन्हा वेगळे निकष वापरून आणखी काही तालुके आणि महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. हा दुष्काळ जाहीर करताना लातूर जिल्ह्याने वापरलेली पध्दतच राज्य पातळीवर वापरण्यात आली असून यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी पहिल्यांदाच मंडल हा निकष वापरण्यात आला आहे. हा निकष वापरण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. हा आग्रह मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दीपावलीपुर्वीच मराठवाड्यासाठी जणू मिठाई पाठवली आहे. याबद्दल पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यानी मराठवाड्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत, असे त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Comments