HOME   टॉप स्टोरी

लातूर-मुंबई नवी रेल्वे लवकरच सुरु होणार

रेल्वेच्या जीएमनी दिले खासदारांना आश्वासन, पोलिस चौकीचेही उदघाटन


लातूर: लातूर-मुंबई ही मोठ्या कष्टाने संयमाने मिळवलेली रेल्वे बिदर-मुंबई झाली. लातुरकरांनी आंदोलने केली पण उपयोग झाला नाही. उलट खासदारांनी बिदर आणि उदगीरकरांची मने जिंकली. त्यामुळे लातुरकर अजूनही नाराज आहेत. लातूर-मुंबई गाडीत किमान ३० टक्के रुग्ण असायचे, उपचारासाठी त्यांना मुंबईला जाणं आवश्यक असायचं पण आता ही गाडी बिदरपर्यंत गेल्यानं त्यांना न्याय मिळत नाही. आज रेल्वेचे जनरल मॅनेजर देवेंद्र शर्मा लातूर भेटीवर आले होते. त्यांनी स्थानकाची पाहणी केली. तिथला कर्मचारी वर्ग, त्यांच्या अडचणी यावर सकारात्मक चर्चा केली. या बैठकीला खा. सुनील गायकवाडही हजर होते. त्यांनी लातूर-मुंबई नव्या गाडीचा आग्रह धरला. देवेंद्र शर्मा यांनी या गाडीचे उत्पन्न, प्रवाशांचा प्रतिसाद याचा तपशील तपासून घेतला आणि लवकरच नवी लातूर-मुंबई नवी गाडी सुरु करु असे आश्वासन त्यांनी आजच्या बैठकीत दिले. कुर्डुवाडी ते लातूर या दरम्यान विद्युतीकरण केले जाईल अशी माहिती खा. सुनील गायकवाड यांनी दिली.


Comments

Top