HOME   टॉप स्टोरी

फुले दांपत्याला घोषित करा भारतरत्न

ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी, सावता परिषदेने केले धरणे आंदोलन


लातूर: आज महात्मा फुले यांच्या स्मृतीदिन. याचे औचित्य साधून सावता परिषदेने राज्यव्यापी धरणे अंदोलन केले. याचाच भाग म्हणून लातुरात महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर धरणे अंदोलन करण्यात आले. महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करावे, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण अबाधीत ठेवावे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करावा, महिला आणि बहूजन शिक्षणाचे प्रसारक महात्मा फुले यांची जयंती दिनी शिक्षक दिन म्हणून घोषीत करावा, पुणे येथील भिडे वाड्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे. या मागण्या अंदोलनकर्त्यांनी केल्या. यावेळी अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, अ‍ॅड. प्रदिप गंगणे, अ‍ॅड. किशोर शिंदे, अविराजे निंबाळकर, राज क्षिरसागर, उमेश कांबळे, रणधीर सुरवसे, राम बुरबुरे, मनोज डोंगरे उपस्थित होते.


Comments

Top