HOME   टॉप स्टोरी

स्थायीच्या सभापतींनी उपसले झाडांवरचे खिळे!

झाडांनाही भावना असतात लावता आली नाही तरी किमान आहे ती टिकवा


लातूर: माणसांप्रमाणे झाडांनाही भाव-भावना असतात परंतु असे असेल तरी माणूस झाडांच्या भावनांचा विचार न करता स्वत:च्या स्वार्थांसाठी झाडांना जखमी करून आजारी पाडतो. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते व झाडाचे आयुष्यमान कमी होते. तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे झाडांना वेदनामुक्त करण्यासाठी झाडांना ठोकलेले खिळे काढण्याची मोहिम चालू केल्याचे स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे म्हणाले. अंघोळीची गोळी फांऊडेशन आणि पंडित दीनदयाल उपाध्याय फाऊंडेशन या सामाजिक संस्थांनी खिळेमुक्त झाड हे अभियान लातुरात राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील गांधी चौकाणि मिनी मार्केट परिसरातील झाडांवर ठोकलेले खिळे काढून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ लातूर महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुरेश जाधव, नागेश जाधव, तुषार वारंग, शिरील गायकवाड, बालाजी सगर, सचिन झेटे, स्मितल वाघमारे, शाम जाधव, पूजा डांगे यासह इतर सदस्य उपस्थित होते.


Comments

Top