HOME   टॉप स्टोरी

आजलातूर संवाद न्यूज सेवेचा मान्यवरांनी केला गौरव

वर्धापन दिन साजरा, लातूर की अदालतची मागणी, पुढील वर्षी धामधूम


लातूर: आजची बातमी आजच वाचायला आणि पहायला शिकवणार्‍या आजलातूर या व्हिडीओ न्यूज पोर्टल आणि संवाद एसएमएस वृत्तसेवेने आज दहाव्या वर्षात पदार्पण केले. आज नववा वर्धापनदिन पत्रकार संघाच्या कार्यालयातील सभागृहात साजरा करण्यात आला. खासदार सुनील गायकवाड यांनी या सेवेमुळे लातूर जिल्ह्याला कसा फायदा झाला हे विषद केले. संवाद किंवा आजलातूरची बातमी खात्रीची असते त्यामुळे आम्ही देशात कुठेही असू लातूरात काय चालले आहे याची माहिती मिळत राहते असे महापौर सुरेश पवार यांनी सांगितले. मनपाचे स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी ही सेवा आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्याचे नमूद केले. माहिती सहसंचालक मिरा ढास यांनी अशा सेवा आणखी मजबूत झाल्या पाहिजेत असं सांगत आजलातूरची माहिती कार्यालयाला झालेली मदत विषद केली. ‘माध्यमांवर बोलू काही’ असे या कायक्रमाचे स्वरुप होते.
आजलातूर आणि संवाद वृत्तसेवेच्या सुरुवातीपासून आधार देणारे इश्वर बाहेती, अतुल ठोंबरे आणि सुहास शेट्टी यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. यापुढे लातूर की अदालत नावाचा कार्यक्रम सुरु करावा अशी सूचना त्यांनी मांडली. या सर्वांचा अनोख्या भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सुनिता कुलकर्णी-देशमुख, विधिज्ञ मिरा कुलकर्णी देवणीकर, प्रदीप गंगणे, डॉ. ऋजुता अयाचित, संजय अयाचित, डॉ. प्रणिता चाकूरकर, काकासाहेब घुटे यांनी जुन्या नव्या माध्यमांबद्दल मते मांडली. कार्यक्रमाचे मुख्य ज्युरी अतुल देऊळगावकर यांनी सर्वांची मते लक्षात घेऊन निष्कर्ष माडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे, प्रदीप नणंदकर, भारती गोवंडे, प्रतिभा जगताप, शिवानी जगताप, किशोर पुलकुर्ते, ऋषी होळीकर, अमोल इंगळे, टीव्ही रिपोर्टर नितीन बनसोडे, रत्नाकर निलंगेकर, अमोल इंगळे, प्रा. योगेश शर्मा, शौनक जगताप यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


Comments

Top