लातूर: लातूर न्यायालयातील सहाय्याक सरकारी वकील अनुराधा शिवाजीराव झांपले यांना २५०० रुपयांची लाच घेताना लातूर लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. एका प्रकरणामध्ये पक्षकाराच्या विरोधात चालू असलेल्या खटल्यात तारीख वाढवून देण्याचे काम केले. तसेच पुढची तारीख वाढवून देण्याच्या कामात मदत करण्यासाठी २५०० रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांच्या केबीनमध्येच ही लाच स्विकारण्यात आली. ती एसीबीने ट्रॅप केली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणातील सापळा पोलिस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक माणिक बेद्रे, पीआय वर्षा दंडीमे, कुमार दराडे यांनी आयोजित केला होता. तो यशस्वी करण्यासाठी पोहेकॉ संजय पस्तापुरे, व्यंकट पडीले, पोलिस नायक लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, नानासाहेब भोंग, शैलेश सुडे, विष्णू गुंडरे, सचिन धारेकर, दत्ता विभुते, प्रदीप स्वामी, शिवकांता शेळके, राजू महाजन यांनी परिश्रम घेतले. पोलिस उपाधिक्षक माणिक बेद्रे पुढचा तपास करीत आहे असे या विभागाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Comments