लातूर: लातुरात नव्याने सुरु झालेल्या जनेरिक मेडीकल स्टोअरमधून रुग्णांना उत्तम सेवा मिळेल ही अपेक्षा आहे. लातुरात अशी जनेरिक मेडीकल स्टोअर्स अर्थात स्वस्त औषधी दुकाने लातुरात सुरु व्हायला हवीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधी घेऊ नयेत. औषध दुकानदार अर्ध्या डॉक्टरांचं काम करतात. औषधाच्या दुकानात तज्ञ फार्मासिस्टच असायला हवा. जनेरिक मेडीसिन्सबाबत आणखी जनजागृती व्हायला हवी. असे मत आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केले. गांधी चौकातील टेलीफोन भवन समोरील मनपाच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या जनेरिक मेडीकल स्टोअर्स अर्थात स्वस्त औषधी दुकानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लातूर शहरातील अनेक फार्मासिस्ट्स, डॉक्टर्स, नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments