लातूर : बडोदा बँक देना बँक आणि विजया बँकेच्या विलिनीकरण धोरणास विरोध करण्यासाठी लातुरात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
19 जुलै 1969 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. सध्या मात्र सरकार बँकांचे विलीनीकरण करून महाकाय बँका स्थापन करत आहे परंतु या बँका कुणासाठी असा संतप्त सवाल कर्मचारी संघटनेच्यावतीने उपस्थित केला जात आहे. सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे. बँकांच्या एकत्र करण्याचा हा हट्ट केवळ सरकार साठीच नव्हे तर देशाच्या दृष्टीने देखील आत्मघातकी ठरू शकतो.
बडोदा बँक विजया बँक आणि देना बँकेचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. केवळ मोठी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या कारणासाठी या बँकांचे विलिनीकरण करण्यात येत आहे. सरकारच्या या बँक वृद्धी धोरणाला लातूर शहरातील सर्व बँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी विरोध केला असून या निमित्ताने आज लातुरात निदर्शनेही करण्यात आली. अधिकारी कर्मचारी यांनी रॅली काढली. आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात कॉम्रेड धनंजय कुलकर्णी, उत्तम होळीकर, दीपक माने, दीपक कुमार परमेश्वर बदगिरे, सदाशिव मुगावे, महेश गांदले ,स्वप्निल जाधव, आदित्य देशपांडे, प्रणाली मेश्राम, रेशमा भवरे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.
बॅंक कर्मचार्यांच्या या संपात लातूरचे २००० कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे ७०० ते ९०० रुपयांची उलढाल थांबली. लातूरच्या बडोदा बॅंकेसमोर या कर्मचार्यांनी निदर्शने केली अशी माहिती उत्तम होळीकर यांनी दिली.
Comments