लातूर: लातुरच्या शिकवणी व्यवसायात चालू असलेल्या अप्रिय घटनांबाबत पालकमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली होती. कुठेच न्याय मिळत नसेल तर माझ्याकडे या असे आवाहन त्यांनी केले होते. त्याचाच धागा पकडत शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी निशाणा साधला. ज्यांचे बगलबच्चे खंडणी जमवतात त्यांच्याकडेच खंडणीविरुद्ध न्याय कसा मागायचा? अशी चर्चा लोक करु लागले आहेत. न्याय मागायचा तर पोलिस आहेत, त्यांच्या वर पोलिस अधीक्षक आहेत, त्यांच्या वर विभागीय महानिरीक्षक आहेत. मग मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती आहेत. ही सगळी यंत्रणा न्याय मागण्यासाठी मिळाली आहे असे साळुंके म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Comments