HOME   टॉप स्टोरी

उड्डाण पुलाखाली पडला लोखंडी खांब अनेकजण बचावले

चार तरुणांनी बाजुला केला लोखंडी खांब, तरीही धोका कायम


लातूर: आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजी चौकातील पुलाखाली मोठा लोखंडी खांब कोसळला. यातून एक महिला बालंबाल बचावली. वेळीच लोकांच्या लक्षात आल्याने वाहतूक जागेवरच थांबली. बराच काळ हा सीन चालू होता. पण कुणीही पुढे येऊन त्यावर इलाज केला नाही अखेर गोविंद उफाडे याने तीन मित्रांना बोलावून घेतले. या चौघांनी ओ बाजुला हटवला. आता हा खांब दुसर्‍या खांबावर टेकला आहे. तो कसल्याही धक्क्याने पुन्हा कोसळू शकतो. यावेळी मात्र भुयारी मार्ग आणि त्याच्या बाजुची खुल्या मार्गाची मोठी अडचण होणार आहे. हे प्रकरण कुणाच्याही जिवावर बेतू शकतं. खांब बाजुला करण्यासाठी गोविंदच्या मदतीला करण गालफाडे, साजीद तांबोळी आणि शेख आरमान हे चौघे धावून आले.


Comments

Top