लातूर: येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमत चाचणी घेण्याची मोहीम आम्ही सुरु केलीय. काल महापालिकेत विविध कामांसाठी आलेल्या सामान्य जनतेची मतं जाणून घेतली. बहुतेकांनी कॉंग्रेसच्या बाजुने कल दिल्या. खवळलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला शिव्याही दिल्या. असो. आज आम्ही लातूर बसस्थानकावर प्रवाशांना गाठले. त्यांची मतं जाणून घेतली. इथं मात्र संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. कुणी म्हणालं जनताच ठरवेल, तर कुणी म्हणालं सकाराम काय अन तुकाराम काय सगळे सारखेच. काहींनी भाजपाचे बाजू उचलून धरली तर कुणी कॉंग्रेसचं समर्थन केलं. बघा तुम्हीच........
Comments