HOME   टॉप स्टोरी

बसची ट्रकला धडक, ३७ जखमी

तीन १०८ रुग्णवाहिका तातडीने हजर, सरकारी दवाखान्यात उपचार


लातूर: कालच्या अपघातानंतर आज दुपारी दोनच्या सुमारास दुसरा अपघात झाला. भरधाव एसटीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने बसमधील ३७ प्रवासी जखमी झाले. अनेकांचे दात तुटले आहेत. अनेकांच्या हातापायांना फ्रॅक्चर्स झाली आहेत. कुणाच्या डोक्याला तर कुणाच्या डोळ्यांना इजा झाली आहे. याचवेळी महाराष्ट्र आर्यन सेनेचे संस्थापक उपाध्यक्ष अनिल वेरेकर तिथून जात होते. त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह जमेल तशी मदत सुरु केली. १०८ ला फोन केला. तातडीने तीन रुग्णवाहिका तेथे दाखल झाल्या. त्यातून जखमींना लातुरच्या सर्वोपचार रुग्णालयात आणले. यावेळी एसटीचे अधिकारीही रुग्णालयात हजर होते. त्यांनी प्रत्येक रुग्णाला तातडीची पाचशे रुपयांची मदत केली. ट्रक पुढे होता तो लातूरकडे निघाला होता. बस मागे होती. ट्रकला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याच्या नादात हा अपघात घडला अशी माहिती प्रवाशांनी दिली.


Comments

Top