HOME   टॉप स्टोरी

खेळणीतल्या नोटेनं बनवलं मामा!

नवीन नोटांबद्दल संशय अन नाराजी, अनेकदा तपासून बघतात!


लातूर: सरकार बदललं, नोटाही बदलल्या. पाच दहा, पन्नास, शंभर, दोनशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात आल्या. या नोटांचा आकार लहान, कागदहे कमी प्रतिचा, रंगसंगतीही विचित्र वाटणारी अशी आहे. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनात असताना गृहिणीच्या हातात पाचशेच्या भारदस्त नोटा ठेवल्या की तिला आनंद वाटायचा. आता दोन हजाराच्या चार नोटा दिल्या तरी तिच्या चेहर्‍यावर खुशी दिसत नाही. व्यापार नावाचा एक लहान मुलांचा खेळ आहे. त्यात भारतीय चलनातल्या नोटा दिल्या जातात. या नोटा हुबेहूब असतात पण त्यावर बच्चों की बैंक असं छापलेलं असतं. आता सरकारने काढलेल्या नव्या नोटाही व्यापार नावाच्या खेळात आल्या आहेत. त्याही हुबेहूब दिसतात. गर्दीत अशा नोटा खपवल्या जात आहेत. लातुरातल्या एका दुकानदारानं ही नोट दाखवली, आपणही फसलो असं त्यानं सांगितलं. एकूणच खेळण्यातल्या नोटा, खेळण्यातल्या आहेत की खर्‍या आहेत हे प्रत्येकाने तपासूनच घ्यायला हवे.


Comments

Top