लातूर: लातूर शहर आणि आजुबाजुच्या अनेक गावांना टीव्ही केबल नेटवर्क पुरवणार्या लातुरच्या कंट्रोल रुमला काही केबलचालकांनीच आग लावल्याची घटना अज सकाळी घडली. यात पाच ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज हाथवे कंपनीचे लातुरचे कार्यालप्रमुख दीपरत्न निलंगेकर यांनी सांगितले.
ट्रायच्या नव्या नियमांमुळे केबल सेवा आणि डिश सेवाही महागणार आहे. याचे केबलच्या व्यवसायावर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळे परिणाम दिसत आहेत. ट्रायच्या नव्या नियमाच्या विरोधात ही सेवा बंद ठेवायची असाही निर्णय केबल चालकांनी घेतला होता. त्यानुसार अनेक भागातील केबल तोडण्यात आले. केबल सेवा बंद ठेवण्यात आली. आमच्या भागातील सेवा सुरु करा असे काहीजणांचे म्हणणे होते. आज सकाळी धनराज साठे, दत्ता पेडणेकर आणि त्यांच्या साथीदारांनी औसा मार्गावरील हाथवेच्या कंट्रोल रुममध्ये पेट्रोल ओतून आग लावली. या आगीत केबलची यंत्रणा जळाली, कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले असे निलंगेकर म्हणाले.
Comments