लातूर: सत्ताधारीच अवैध काम करु लागल्याने लातुरला नवा महापौर मिळू शकतो. गाळेधारकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठरलं आहे. आलेला निधी वापरला जात नाही. सामान्यांचे प्रश्न तसेच आहेत. ज्याला पाचशे रुपये भाडे होते त्याला साडेनऊ हजारांची नोटीस आली आहे. बाजारात मंदी आहे. रोज दोनशे रुपये कमावणार्याने काय करायचे? आम्हाला फाशी घ्यावी लागेल असं पत्र एका गाळेधारकाने दिले आहे. त्यासाठीच उद्या मोर्चाचं आयोजन केले आहे. आपण मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन आ. अमित देशमुख यांनी केलं. मनपाच्या गाळेधारकांच्या प्रश्नी गांधी मार्केट येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
आता निवडणुका जवळ आल्या आहेत. आजच भाजपा-सेनेची युती झाली. सगळे राग, लोभ विसरुन गेले. पूर्वी एकटी भाजपा लुटायची आता युतीच्या नव्या नियप्रमाणं सगळंच फिप्टी फिप्टी होणार आहे असा टोलाही आ. देशमुख यांनी लगावला. यावेळी शहराच्या विविध भागातील मनपाचे गाळेधारक-व्यावसायिक उपस्थित होते. अनेकांनी मनपाबाबत तक्रारी मांडल्या. करवाढ आणि भाडेवाढीबाबत नाराजी व्यक्त केली.
Comments