लातूर: अत्यल्प दाबाने पाणी, कमी वेळ पाणी. नगरसेविकेच्या घरासमोर संतप्त नागरिकांची नेहमीच रांग. अनेक अर्ज देऊन झाले. विनंत्या केल्या. अधिकार्यांना प्रभागात प्रत्यक्ष आणून स्थिती दाखवणं झालं. पण उपयोग होत नाही. आज नगरसेविका बासले सकाळी साडेसहा वाजता टाकीकडे आल्या. त्यांनी आधी त्यांनी फोन केला पण तिथला कर्मचारी म्हणाला, मी झोपेत आहे. फोन बंद करा. मग जेव्हा बासले आल्या तेव्हा काय घडलं ते पहा आणि ऐका. अजून एक किस्सा. सावेवाडीतल्या एकाच लाईनमध्ये सगळ्या नळांना पाणी येतं पण त्याच लाईनमधल्या कुलकर्णी यांच्या नळाला आणि केशवराज अपार्टमेंटला पाणी येत नाही. आहे की नाही कमाल?
Comments