लातूर: लातुरचे चित्रकार सुरेंद्र भगवानराव जगताप सर्वदूर प्रसिद्ध आहेत. ते रहेजा स्कूल ऑफ आर्ट अॅंड आर्किटेक्चर कॉलेजला प्राध्यापक होते. पण या महाविद्यालयाच्या प्रशासनाने सरकरी अनुदान नाकारलं. कॉलेज व्यावसायिक केलं आणि सगळेच कर्मचारी उघड्यावर पडले. अशा अवस्थेत जगताप यांनी मुंबईचं जेके एज्युकेशनल सोसायटी गाठली. सगळ्या ५२ कर्मचार्यांना घेऊन चित्रकला महाविद्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव दिला. जेकेनं प्रस्ताव स्विकारला. सर्व कर्मचार्यांना घेऊन महाविद्यालय सुरु केलं. महाविद्यालयानं त्यांना प्राचार्यही केलं. सरकारची परवानगी मिळवली आणि अनुदानही पदरात पाडून घेतलं. सगळे कर्मचारी स्थिरावले! अलिकडे चित्रकारांनी काढलेल्या चित्रांची मागणी-विक्री अत्यंत कमी झाली आहे. कॉपी पेस्टचा जमाना आहे ना! पण उद्या चित्रकरांनी नवनिर्मिती थांबवली तर कॉपी पेस्ट कशी होईल? म्हणजे आज चित्रकारांना वाईट दिवस आले आले तरी त्यांचे भवितव्य संपलेले नाही!
याच जगतापांनी लातूर आणि मराठवाड्यातून येणार्या गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला. प्रसंगी अनेकांना आपल्या घरातही निवारा दिला. अनेकांना वसतीगृहे मिळवून दिली. अनेकांची चित्र प्रदर्शनेही भरवली.......बघा त्यांची खास मुलाखत.
Comments