औसा : दोन दिवसांपुर्वी मोदी यांची सभा औसा येथे झाली. लातूर आणि उस्मानाबाद या मतदार संघांची सभा औसा येथे घेण्यात आली. या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यासह अन्य मान्यवर उपस्तिथ होते. यावेळी जमलेल्या जनसमुदायाने पिलेल्या पाण्याचे पिशव्या यासह अन्य कचर्याचे संकलन १८ नगरसेविकांनी आणि संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा परिसर पुर्ण साफ केला. यासोबत देशातील कॉंग्रेसरुपी विचारांची जी घाण आहे ती देशातुन हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे असे निलंगेकर म्हणाले. स्वच्छ भारत २०१९ या अभियानातुन प्रेरणा घेवून हा उपक्रम राबविण्यात येतो आहे असे शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला. लातूर महानगरपालिकेस कचरा व्यवस्थापणामध्ये देशातील पहिले पारितोषक मिळाले आहे.
Comments