लातूर: ०८ एप्रिल रोजी अहमदपूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी साजिद सय्यद नामक इसमाने मराठा समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याने अहमदपुरमध्ये तेढ निर्माण झाला. याची चित्रफित १८ तारखेस समाजमाध्यमांवर पडल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. अशा समाजकंटकास तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी काल अहमदपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रशासनाकडून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज लातूर बंदची हाक सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली होती. काल रात्री आरोपीस पोलिसांनी साजिद सय्यदला अटक केल्यामुळे हा बंद मागे घेण्यात आला. लातूर शहरातील शिवाजी चौकात सकाळी ०८ वाजल्यापासून धरणे अंदोलन केले. सकल मराठासमाजाने बंद मागे घेतल्याची घोषणा केली. यावेळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते. नंतर पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.
Comments