HOME   टॉप स्टोरी

रस्ता झाला मोठा, दुभाजक होणार छोटा!

दुभाजक झाले होते कचरा टाकण्याचे केंद्र, मोकाट जनावरांचा अड्डा


लातूर: लातूरचा जुना नॅरोगेज रेल्वे ट्रॅक हटवून त्यावर मोठा रस्ता तयार करण्यात आला. वाटेतच देशिकेंद्र शाळेसमोर उड्डाण पूलही उभारण्यात आला. या पुलाच्या पलिकडे आणि अलिकडे असलेल्या रस्त्यावर रस्त्यापेक्षा मोठे दुभाजक उभारण्यात आले. या दुभाजकांचा कसलाच फायदा नव्हता. लोक त्यावर गाड्या पार्क करु लागले. गणपतीचे स्टॉल्स उभारले जाऊ लागले. बाकी काळात कचरा टाकण्याची जागा बनली, मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले. आता प्रशासन जागे झाले आहे. हे मोठे दुभाजक हटवून रस्ता मोठा केला जात आहे. या रस्त्यात सामान्य दुभाजक उभारले जाणार आहेत.


Comments

Top