लातूर: काल थायलंडमधून शांतीदूत गौतम बुद्धांच्या तीन मोठ्या मूर्ती लातुरात दाखल झाल्या. या मूर्त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. एक मूर्ती विक्रमनगरातील श्रावस्ती बुद्ध विहारात, दुसरी आनंदनगरात तर तिसरी खरोशाला रवाना करण्यात आली अशी माहिती विलास घारगावकर यांनी दिली.
श्रावस्ती बुध्द विहारात भंते यश कश्यपायन महाथेरो, कोल्हापूर यांच्या मंगल उपस्थितीत, बँड बाजा लावून मुर्तीची मिरवणूक काढून श्रावस्ती बुध्द विहारात सन्मानाने आणली व भंतेजींच्या हस्ते मुर्तीचे विधीवत पुजन करून सामुदायिक बुध्द वंदना घेतली. यावेळी श्रावस्ती महिला मंडळाच्यावतीने खिरदान केले गेले. जगताचे मंगल करायचे असेल तर बुध्द विचाराचीच गरज आहे आणि म्हणून आपण तर बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. तेंव्हा आपण दररोज बुध्द विहारी गेले पाहिजे. धम्म विचाराने जगले पाहिजे. म्हणजे निश्चीत आपली उद्याची पिढी संस्कारमय, सक्षम होईल. आणि प्रबुध्द भारत घडविण्यास निश्चीत यश येईल असे श्रावस्ती बुध्द विहाराचे सचिव विलास घारगावकर म्हणाले. यासाठी प्रत्येकाने बौध्द धर्म स्विकारून कागदावर बौध्द अशी नोंद शासकीय दप्तरात लावून खर्या अर्थाने बौध्द व्हा हे आवाहनही भंते यश कश्यपायन महाथेरो यांनी केले. यावेळी पुण्यावरून बुध्दरूप आणण्यासाठी गेलेले ट्रस्टचे पदाधिकारी देविदास आचार्य, विलास घारगावकर, हिराचंद धायगुडे, आनंद डोणेराव, आत्माराम बानाटे, जितेंद्र साबळे, अविनाश सरवदे यांचाही सत्कार गुलाब पुष्प देवून केला. तर बुध्द रूपाची पुजा ज्योती घारगावकर आणि सुशिला डोणेराव यांच्या हस्ते केली गेली. यासाठी कांताबाई कांबळे, करूणा कांबळे, मंगल धायगुडे, पुष्पा शिंदे, शिवकांता सवई, शेषाबाई जोगदंड, शेषाबाई शिंदे, विजयमाला सरवदे, कुसूम बानाटे, राधाबाई सुर्यवंशी, सारीका टेंकाळे, विजया करवंजे, पुष्पा गायकवाड, संजीवनी गुंजरगे, प्रतिभा सावळे यासह अनेक महिला उपासक-उपासिका लहानथोर बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments