लातूर: गावरान आंब्याची आवक मागच्या वर्षापेक्षा कमी आहे. सातत्याने कमी होत गेलेलं पर्जन्यमान्य, वादळ-वारे यामुळे आंब्याची झाडं फारशी बहरली नाहीत. अनेक ठिकाणच्या आंब्याच्या झाडांना मोहोरही आला नाही. परिणामी गावरान आंबा कमी आलाय. आज आम्ही शिवाजी चौकातील आंबा विक्रीचा आढावा घेतला. विक्रेते कमी होते पण त्यांच्याकडच्या गावरान आंब्यांचा रंग अतिशय आकर्षक आणि मोहक होता. गावरान आंब्यावरही रसायनांचा प्रयोग केला चाललाय असाही आरोप नव्याने पुढे येत आहे. कारण गावरान आंबे केशर, बदाम, हापूस, पायरीसारखे सहसा मोहक रंगात येत नसत. आज आम्ही गावरान आंबे पाहिले ते महागड्या आंब्याच्या तुलनेत तितकेच मोहक दिसत होते. गावरान आंबा म्हटलं की काहीशी आंबट गोड चव असते. ती अनेकांना आवडते. म्हणून जाणकार लोक गावरान आंबा किमान एकदा तरी खावा असा प्रयत्न करीत असतात.
Comments