लातूर: लातुरनं अनेक रत्न दिली. अनेकांनी महाराष्ट्र, देश अन काहींनी तर जगही गाजवलं. असंच एक रत्न छाया साखरे. मुंबईच्या समतानगरातील मनपाच्या शाळेत त्या संगीत शिक्षिका आहे. किराणा घराण्याच्या प्रख्यात गायिका पद्मभूषण प्रभा अत्रे यांच्याकडे संगिताचे धडे घेतलेल्या छाया साखरे यांना परवाच मुंबईचा महापौर पुरस्कार मिळाला. गुजरातच्या गिरनार फेस्टीव्हलमध्ये त्यांचं गायन झालं. तिथेही पुरस्कार मिळाला झीच्या डान्स महाराष्ट्र डान्समध्ये झोपडपट्टीत राहणार्या विद्यार्थ्यांचं लोकनृत्य सादर केलं. तिथंही पुरस्कार मिळवला. मराठी गाण्यातील व्हल्गॅरिटीवर त्या नाराज आहेत. गीतकार, संगीतकार आणि निर्मात्यांनी याची काळजी घ्यायला हवी. नव्या पिढीत चांगलं टॅलेंट आहे ते मात्र ओळखता आलं पाहिजे असं छाया सांगतात. अलिकडे प्रख्यात गझलगायक, भजन गायक अनुप जलोटा यांच्या सोबत त्या काम करतात. पहा ऐका त्यांची मुलाखत आणि एक जुनं अप्रतिम गाणं.....
(छाया साखरे 9987285533)
Comments