लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात होत आहे. पहिल्यांदा पोस्टल मते मोजली जातील त्यानंतर व्हीव्हीपॅट आणि इव्हीम ममशीनवरील मते मोजली जातील. विधानसभानिहाय चौदा टेबल, एकूण ८४ टबलांवर मतमोजणी होईल. लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १८ लाख ८३ हजार ५३५ एवढी असून त्यापैकी पुरुष मतदार ०९ लाख ९१ हजार ९५० तर महिला मतदारांची संख्या ०८ लाख ९१ हजार पाचशे ७६ आणि अन्य मतदार ०९ आहेत. यंदा ११ लाख ७० हजार ३९८ मतदारांनी मतदान केले.
या निवडणुकीत भाजपाचे सुधाकर शृंगारे, कॉंग्रेसकडून मच्छींद्र कामत, वंचित बहुजन विकास आघाडीचे राम गारकर प्रमुख उमेदवार आहेत. मच्छींद्र कामंत यांनी यापूर्वी राष्ट्रवादीकडून उदगीर विधानसभा लढवली होती. जिल्हा परिषद सदस्य असलेल्या शृंगारे यांनी फार पूर्वीपासूनच लोकसभेची तयारी चालवली होती. पालकमंत्र्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. राम गारकर यांनी शिक्षणाधिकारी म्हणून काम केले होते. त्यांचाही जिल्हाय्त मोठा संपर्क आहे.
Comments