लातूर: लक्षवेधी लातूर मतदारसंघ पुन्हा भाजपाने काबीज केला. सुधाकर शृंगारे दोन आख साठ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. मतमोजणी केंद्राबाहेर दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी भर उन्हात विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. तिकडे शहरात विजयी मिरवणुकीची तयारी सुरु होती. या दरम्यान शृंगारे चुकूनही मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत. गंजगोलाई ते हनुमान चौक, हनुमान चौक ते सुभाष चौक आणि पुन्हा उभाष चौक असा मिरवणुकीचा मार्ग होता.
विसाव्या फेरीअखेर शृंगारे यांना ०४ लाख ६९ हजार ७३ मते मिळाली. कॉंग्रेसचे कामंत यांना ०२ लाख ६७ हजार २६१ तर वंचित विकास आघाडीचे राम गारकर यांना ८२ हजार ८८७ मते मिळाली. थोडीफार मतमोजणी बाकी होती. पण त्याने शृंगारेंवर कसलाच परिणाम झाला नाही. उशिरापर्यंत शृंगारे यांच्याशी संपर्क झाला नाही. मतमोजणी केंद्रावर मात्र प्रशासनाची कमाल पहायला मिळाली. निवडणूक विभागाने पत्रकारांसाठी दोन प्रकारच्या प्रवेश पत्रिका वितरीत केल्या होत्या. प्रवेशद्वारावर पोलिसांनी उभ्या पत्रिकावाल्यांना प्रवेश दिल्या. आडव्या पत्रिकाधारकांना समोर उन्हातान्हात सावली पकडून आडवे व्हावे लागले. हा उभ्या अन आडव्याचा प्रयोग नेमका काय होता हे अजून कळायला मार्ग नाही!
लातुरच्या या निवडणुकीत भाजपा प्रचंड आक्रमक होती. त्यामानाने कॉंग्रेसने शांतता बाळगली होती. एक सोडली तर मोठ्या सभा झाल्या नाहीत. बिचारे कामंत उगाचच खपले अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत होती.
Comments