HOME   टॉप स्टोरी

विलासरावांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त ७४ जणांचे रक्तदान

सदासुख रुग्णालयात शिबिराचे आयोजन, आ. अमित देशमुखांनी केले रक्तदान


लातूर : विकासरत्न माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त लातुरात सदासुख हॉस्पिटल यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७४ रक्तदात्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. २५ मे शनिवार रोजी हे शिबीर पार पडले.
सध्या उन्हाळा आणि लग्नसराईचे दिवस असल्याने बहुतांश रक्तपेढ्यात रक्त संकलन कमी आणि रक्ताची मागणी अधिक असून मुबलक रक्त रक्तपेढ्यात उपलब्ध नसल्याने रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता येथील सदासुख हॉस्पिटल व मित्र परिवार तसेच लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विकासरत्न माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७४ व्या जयंती दिनाचे औचीत्त्य साधत शहरातील सदासुख हॉस्पिटल या ठिकाणी २५ मे शनिवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराची सुरुवात विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्वप्रथम रक्तदान केले.
यावेळी लक्ष्मीरमण लाहोटी, बीव्ही मोतीपवळे, विक्रम हिप्परकर, डॉ. चेतन सारडा, डॉ. विक्रम सारडा, डॉ. सुजाता सारडा, डॉ. राखी सारडा, डॉ. रमेशचंद्र सारडा, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. अशोक पोतदार, डॉ. दीपक गुगळे, डॉ. एस. एच.भट्टड, डॉ.जाजू, डॉ. अजय जाधव, डॉ. बरमदे, डॉ. भोसले, कमलकिशोर अग्रवाल, प्रकाश कासट, संजय निलंगावकर, जयेश बजाज, अतुल देऊळगावकर, समद पटेल, सुपर्ण जगताप, मोहन सुरवसे, ज्ञानेश्वर सागावे यांच्यासह वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ.जाजू यांनी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या कार्याची आठवण करून देत शहरातील डॉ. भालचंद्र रक्तेपेढीच्या उदघाटन प्रसंगी सर्वप्रथम विकासरत्न विलासराव देशमुख यांनी रक्तदान केल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी या रक्तदान शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या मान्यवर तसेच रक्तदात्यांचे सदासुख हॉस्पिटल व मित्रपरिवाराच्या वतीने डॉ. चेतन सारडा यांनी आभार मानले.


Comments

Top