लातूर: लोकनेते, महाराष्ट्राचे भूषण विलासराव देशमुख यांची आज जयंती. या निमित्ताने बाभळगावातील विलासबागेत आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत हजारोजणांनी त्यांना अभिवादन केलं. भक्तीगितांच्या पार्शवभूमीवर राज्यभरातून आलेल्या अनेक अनेक नेत्यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. संगीतकार बोरगावकर आणि त्यांच्या चमूने अनेक भक्तीगीतं सादर केली. यामुळे वातावरण भक्तीमय आणि भावनिक बनले होते. देशमुख कुटंबियातील श्रीमती वैशालीताई देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ. अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, धीरज देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी समाधी स्थळावर माथा टेकला. वातावरण भाऊक बनले होते. यावेळी आ. त्र्यंबक भिसे, अभिजित देशमुख, संभाजी सूळ, प्रदीप नणंदकर, अतुल देऊळगावकर, चांदपाशा इनामदार, श्रीशैल उटगे, विक्रम हिप्परकर, पृथ्वीराज शिरसाट, व्यंकट बेद्रे, आबासाहेब पाटील, राजाखां पठाण, बबन देशमुख, धनंजय देशमुख, प्रशांत दुधमांडे, संभाजी रेड्डी, हेमंत वैद्य, सुपर्ण जगताप, बीव्ही मोतीपवळे, दिलीप माने, लक्ष्मीरमण लाहोटी, विनायकराव पाटील कवठेकर, कैलाश कांबळे, राम कोंबडे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि हजारोजण उपस्थित होते.
Comments