HOME   टॉप स्टोरी

दवाखान्यातून आरोपी फरार, एमआयडीसीत होता गुन्हा दाखल

एमआयडीसी ठाण्याची गुणवत्ता वाढू लागली, याआधी ठाण्यात मरण पावला होता आरोपी


दवाखान्यातून आरोपी फरार, एमआयडीसीत होता गुन्हा दाखल

लातूर: लातूरसह लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. ठाण्यातून, कोर्टातून फरार होण्याचा सिलसिला अजून जारी आहे. याआधी गांधी चौक ठाण्यातून आरोपी फरार झाला होता. नंतर दुसरा कोर्टातून फरार झाला. त्यानंतर एमआयडीसी ठाण्यातील शौचालयात एका आरोपीचा मृतदेह सापडला होता. आता आज लातुरच्या सरकारी दवाखान्यातून एक आरोपी सकाळी चार वाजता फरार झाला आहे. सबंध पोलिस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे.
आधी अनेक गुन्हे असलेला महेश उर्फ चुन्नुमियां शेख असे या आरोपीचे नाव आहे. खाडगाव मार्गावरील रहिवासी असलेल्या या आरोपीवर एमआयडीसी ठाण्यात ३७६-३७७ चा गुन्हा दाखल आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास या आरोपीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी दोन पोलिसांना नेमण्यात आले होते. मात्र हे दोघेही झोपले होते. या संधीचा फायदा घेऊन आरोपी चुन्नुमियां फरार झाला. ही बाब कळताच पोलिसांची झोप उडाली. या आरोपीला शोधण्यासाठी सगळीकडे यंत्रणा कामाला लागली आहे. तो सापडेपर्यंत तरी या पोलिसांना झोप लागणार नाही हे निश्चित. एमआयडीसी ठाण्याचे सह पोलिस निरीक्षक आहेत अशोक माळी. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


Comments

Top