HOME   टॉप स्टोरी

पत्रकार भवनातली झाडे पडली तलाठी भवनावर!

वादळी वार्‍याने शहरात उडवला हाहाकार, पत्रे उडाली अनेक झाडे झाली जमीनदोस्त


लातूर: आज संध्याकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वार्‍याने लातुरकरांची दाणादाण उडवले. शहरातील अंबाजोगाई मार्ग, राजीव गांधी चौक आदी अनेक भागात झाडे उन्मळून पडली. अनेक घरांवरचे पत्रे हवेत दिसले. छोट्या व्यावसायिकांची त्रेधा तिरपीट उडाली. अनेकांचे नुकसान झाले. गंजगोलाईत तर कोण कुठे जातोय याचा पत्ता नव्हता. लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयाच्या प्रांगणातील सुबाभूळ आणि गुलमोहराची दोन झाडे तलाठी भवनाच्या छतावर कोसळली. मनपाच्या पथकाने या झाडाच्या मोठ्या फांद्या कापून बाजुला काढल्या. या भागात पंचायत समिती, तहसील कार्यालय आहे. ज्या ठिकाणी झाडे कोसळली त्या ठिकाणावरुन लोकांची मोठ्या प्रमाणावर ये जा सुरु असते. पण सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.


Comments

Top