लातूर: लोकसभेत करिश्मा गाजवणार्या वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभेतील भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार कोण असणार याचा शोध सगळेच पक्ष घेत आहेत. समोरचा उमेदवार कोण त्यावर दुसर्या पक्षाचा उमेदवार ठरतो. पण वंचितचा उमेदवार कोण असेल यावर सगळ्यांची भिस्त आहे. सत्ता मिळेल ना मिळेल, उमेदवार निवडून येतील किंवा नाही त्याही पेक्षा पारंपारिक राज्य पद्धतीला सुरुंग लावण्याची ताकद वंचितमध्ये आहे, यामुळे सगळ्यांचीच काळजी वाढली आहे. याबाबत वंचितचा प्रमुख घटक भारिप बहुजन महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केली. बघा लातुरच्या वंचितमध्ये काय चाललंय.....
Comments